रत्नागिरी - जिल्ह्यात अखेर 56 दिवसांनंतर वाईन शॉप्स सुरू झाली आहेत. त्यामुळे सकाळपासूनच वाईन शॉप्ससमोर मद्यप्रेमींनी एकच गर्दी केल्याचे चित्र सध्या होतं. दुकानांसमोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करून मद्यप्रेमी रांगेत उभे होते.
जिल्ह्यात अखेर 56 दिवसांनंतर वाईन शॉप्स सुरू सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करून मद्यप्रेमी रांगेत - liquor shops open in Ratnagiri
रत्नागिरी जिल्ह्यात अखेर 56 दिवसांनंतर वाईन शॉप्स सुरू झाली आहेत. दुकानांसमोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करून मद्यप्रेमी रांगेत उभे होते.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दारूची दुकाने सुरू होणार अशी चर्चा होती. मागील अनेक दिवसात अनेक मुहूर्त जाहीर झाले, मात्र प्रत्येक वेळी तळीरामांची निराशा होत होती. अखेर मद्यप्रेमींची ही प्रतिक्षा आज संपली असून जिल्ह्यातील दारूची दुकाने आज सुरू झाली आहेत. दारू खरेदीसाठी मद्यप्रेमींना दारु दुकानांसमोर एकच गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचंही इथं व्यवस्थित पालन केलं जात होतं. रत्नागिरी शहराचा विचार करता या ठिकाणी योग्य ते फलक देखील लावण्यात आले होते.
ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर घरी देखील दारू पोहोच केली जाणार आहे. दरम्यान, वाईन शॉपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आपलं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर नोंद करणं देखील बंधनकारक आहे.