रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्प समर्थक संघटना आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट व्हावी यासाठी आपण स्वतः पवार साहेबांना विनंती करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा -रत्नागिरीत रिफायनरी समर्थक संघटनेचे लाक्षणिक उपोषण
खासदार तटकरे म्हणाले की, राज्यातल्या तसेच देशातल्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या संघटना पवार साहेबांना भेटत असतात, त्यामुळे पवार साहेबांची भेट घेण्याची इच्छा प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या संघटनांची असेल, तर पवार साहेबांनी जरूर त्यांना भेट द्यावी, अशी विनंती आपण त्यांना करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे म्हणाले.