रत्नागिरी - महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेकडून प्रादेशिक समतोल राखला जाणार, अशी चर्चा आहे. यात प्रामुख्याने कोकणातून शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवारांच्या हातातील कठपुतळी - निलेश राणे
मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेत नाव असणाऱ्यांमध्ये उदय सामंत यांचेही नाव असल्याचे आता पुढे येत आहे. याबाबत उदय सामंत यांच्यासोबत चर्चा केली असता. सामंत यांनी, मी मंत्री झालो किंवा नाही तरीही माझ्या अविर्भावात कोणताही बदल होणार नाही. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवून काम करण्याची संधी दिली तर नक्की मी नक्की जबाबदारी स्वीकारेन, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी व्यक्त केली.