रत्नागिरी - शहरातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची उपचारानंतरची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड उपस्थित होते.
दिलासादायक... रत्नागिरीची कोरोना शून्यच्या दिशेने वाटचाल...
परदेशातून आलेला शृंगारतळी (गुहागर) येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. गेल्या काही दिवसांपासून या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.
रत्नागिरीची कोरोना शून्यच्या दिशेने वाटचाल...
परदेशातून आलेला शृंगारतळी (गुहागर) येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. गेल्या काही दिवसांपासून या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान या रुग्णाची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण जिल्ह्यात एकमेव कोरोनाचा रुग्ण होता आणि आता त्याचे अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्याबरोबरच रुग्णाच्या दुसऱ्या टेस्टचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.