रत्नागिरी - जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे तर गुहागर तालुक्यातही संततधार सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर, देवघरमधील नागरिकांनाही या पावसाचा फटका बसला असून काही जणांच्या घरात पाणी घुसले आहे.
देवघरमध्ये मुसळधार पाऊस.. रस्त्याच्या कामामुळे पाणी घरांमध्ये शिरल्याचा ग्रामस्थांचा आरोप - deoghar rain
जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे तर गुहागर तालुक्यातही संततधार सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर, देवघरमधील नागरिकांनाही या पावसाचा फटका बसला असून काही जणांच्या घरात पाणी घुसले आहे. रस्त्याच्या कामामुळे घरात पाणी घुसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा - घरगुती वीज ग्राहकांची वीजबिले माफ करा, जनता दलाची मागणी
सध्या गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला गटारांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साठत आहे. त्यामुळे हे पाणी थेट नागरिकांच्या थेट घरात घुसत आहे. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिली आहे. यापूर्वी असं कधीही घडले नव्हते मात्र, यावेळी या रस्त्याच्या कामामुळे घरात पाणी घुसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.