महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाऊ.. परवानगीशिवाय गावात येऊ नका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाडीच्या वेशीवर फलक - धनावडे वाडी रत्नागिरी

संचारबंदीनंतर आता कोकणातील नागरिक देखील कोरोनाबाबत जागृत होताना दिसत आहेत. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून गाड्यांची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, या सर्वामध्ये चर्चेची आणि कौतुकाची बाब ठरली आहे ती धनावडे वाडी.

villagers-seal-the-borders-of-village-dhanawade-wadi-ratnagiri
भाऊ.. परवानगीशिवाय गावात येऊ नका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाडीच्या वेशीवर फलक

By

Published : Mar 27, 2020, 9:33 AM IST

Updated : Mar 27, 2020, 10:39 AM IST

रत्नागिरी - कोरोनाबाबत गावखेड्यातील नागरिक देखील जागरूक झाले आहेत. जिल्ह्यातील कारवांची वाडी गावातील धनावडे वाडी या लोकवस्तीने वाडीच्या वेशीवर फलक लावून इतरांना येण्यास प्रतिबंध घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

भाऊ.. परवानगीशिवाय गावात येऊ नका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाडीच्या वेशीवर फलक
जिल्ह्यात कारवांची वाडी हे जवळपास ४ ते ५ हजार लोकवस्तीचे गाव आहे. त्यामध्ये २५० ते ३०० लोकसंख्या असलेली धनावडे वाडी आहे. सध्या सर्वत्र कोरोनामुळे भीती पसरली आहे. तसेच दक्षता बाळगण्याच्या सूचना देखील वारंवार दिल्या जात आहेत. त्यामुळे या धनावडे वाडीतील लोकांनी गावाच्या सीमेवर 'परवानगीशिवाय प्रवेश नाही, येताना किंवा जाताना वाडीतील नागरिकांची परवानगी आवश्यक आहे', अशा आशयाचा फलक लावला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Last Updated : Mar 27, 2020, 10:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details