रत्नागिरी - जिल्ह्यातील गडनदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील कसे गावामधील ही घटना असून सुनील गुणाजी जड्यार असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
रत्नागिरीतील गडनदीच्या पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यात यश
सुनील जडयार हा शेतकरी शेतीच्या कामासाठी शेतात गेला होता. मात्र, गडनदीला आलेल्या पुरामध्ये तो वाहत गेला.
सुनील जडयार हा शेतकरी शेतीच्या कामासाठी शेतात गेला होता. मात्र, गडनदीला आलेल्या पुरामध्ये तो वाहत गेला. अखेर त्याला एका झाडाचा आधार मिळाला. त्याच ठिकाणी तो अडकून राहिला आणि मदतीसाठी आरडाओरड केली. त्याची ओरड ऐकताच बाजूला असलेल्या शेतातील शेतकरी मदतीसाठी धावून आले.
गावकऱ्यांनी एक मोठी दोरी नदीत टाकली. त्यानंतर गावातील एका तरुण मुलाने ती दोरी नदीच्या दुसऱ्या टोकाला बांधली. त्यानंतर गावातील दोन माणसे झाडावर अडकलेल्या त्या शेतकऱ्याजवळ पोहोचली. अशाप्रकारे त्या शेतकऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली.