रत्नागिरी -राजापूर तालुक्यातील जामदा धरण प्रकल्पावरून ( Jamda Dam Project ) मनसे आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आधी पुर्नवसन आणि नंतर प्रकल्प या मागणीसाठी मनसेसह ग्रामस्थांनी आज ( 20 एप्रिल ) एल्गार केला आणि जामदा धरणाचे काम बंद पडले. तसेच, धरण ठिकाणी काम करणारी वाहने माघारी पाठवली ( Shut Down Work Jamda Dam )आहेत.
जामदा धरणाचे रखडलेले काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे. मात्र, धरणाच्या पुनर्वसनाच्या कामामध्ये जरासुध्दा प्रगती झालेली नाही. तरी देखील आता नव्याने काम सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
ग्रामस्थ आणि मनसेचे कार्यकर्ते प्रतिक्रिया देताना मनसेनेही याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्द्यावरून आज मनसे आणि ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी धडक दिली. जोपर्यंत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत धरणाचे काम पूर्णत: थांबवावे. तसेच, पुर्नवसन झाल्याशिवाय काम करू न देण्याचा इशारा मनसेसह ग्रामस्थांनी दिला. यावेळी शिवसेनेवर रोष व्यक्त करत, आमदार, खासदार यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या ठिकाणी कामे घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे.
हेही वाचा -Satej Patil : सतेज पाटलांनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली; म्हणाले, 'भाजपने इतिहासाची बदनामी...'