दिवाळीसाठी सजल्या बाजारपेठा; बाजारात गर्दी, मात्र खरेदीसाठी ग्राहकांचा निरुत्साह - रत्नागिरीतील बाजारपेठावर कोरोनाचे सावट
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन उठवल्यानंतर दिवाळी हा पहिलाच सण साजरा करण्यासाठी फारसे निर्बंध नसल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या आहेत, विक्रीसाठी व्यापारी वर्ग सज्ज आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये आर्थिककणा मोडून पडलेला ग्राहक वर्ग मात्र, मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडताना दिसून येत नाही. तसेच ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढल्यानेही व्यापाऱ्याना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
दिवाळीसाठी सजल्या बाजारपेठा
रत्नागिरी- आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाऊनचे निर्बंध उठवल्यानंतर पहिल्यांदाच हा सण साजरा केला जात असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अद्यापही कोरोनाचे सावट असले तरीही रत्नागिरी मात्र दिवाळीसाठी सजली आहे. बाजारपेठाही रंगबेरंगी आकश दिवे आणि विद्युत रोषणाईने झगमगू लागल्या आहेत. असे असले तरी कपड्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुकाने याकडे लोकांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
Last Updated : Nov 13, 2020, 5:01 PM IST