रत्नागिरी - शहरासह परिसरात मोटार सायकल व सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. याप्रकरणी एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. आरोपींच्या ताब्यातून 6 दुचाकींसह 2 सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपी यश राजकुमार शर्मा(वय 19 रा. घुडेवठार), सुरज सुरेश सकपाळ (वय 19 रा. तेली आळी), विघ्नेश देंवेद्र भाटकर(वय 19 वर्षे रा. तोणदे) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विषेश मोहिम राबवण्याच्या सुचना दिल्या होत्या.