रत्नागिरी- गुरुवारी सायंकाळी अवकाळी पाऊस बरसल्यानंतर आज पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. 17 मे पर्यंत जिल्ह्यात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळताच हवेत गारवा आला.
विजांच्या गडगडाटात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी, आंबा बागायतदारांची तारांबळ
रत्नागिरी जिल्ह्यात 17 मे पर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र गुरुवारी सायंकाळी अवकाळी पाऊस बरसल्यानंतर आज पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली.
कोसळणारा पाऊस
शहरी भागात हलक्या सरींनी हजेरी लावली. रत्नागिरीतील अनेक भागात हा पाऊस पडला. या पावसामुळे आंबा बागायतदारांची मात्र तारांबळ उडाली आहे.
आंबा पीक आता अंतिम टप्प्यात असताना अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यातील पाऊस हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे.