रत्नागिरी-जिल्ह्यात एकूण 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र यापैकी तब्बल 119 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे एकूण 1818 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे आता उर्वरित 360 ग्रामपंचायतींमधील 2 हजार 109 जागांसाठी 4 हजार 327 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या प्रचाराचा धुरळा गावोगावी उडणार आहे.
1818 उमेदवार बिनविरोध
जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या 479 ग्रामपंचायतींसाठी 3 हजार 921 जागांसाठी 7 हजार 194 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील 1 हजार 49 जणांनी माघार घेतल्याने 1 हजार 818 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.