रत्नागिरी : एसीबीच्या चौकशीमागे केंद्रीय मंत्री नारायण राणेच ( Union Minister Narayan Rane ) आहेत असा आरोप कुडाळ मालवणचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Shiv Senas Thackeray group MLA Vaibhav Naik ) यांनी केला आहे. भालेकर यांनी तक्रार दिली होती, मात्र त्यांना ही तक्रार नारायण राणे यांनीच द्यायला लावली होती, असे त्यांनीच सांगितले. त्यामुळे या तक्रारीमागे राणे कुटुंबीयच आहेत, असे आमदार वैभव यांनी सांगितले. आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी एसीबीकडून साडेचार तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
MLA Vaibhav Naik : एसीबीच्या चौकशीमागे केंद्रीय मंत्री नारायण राणेच - आमदार वैभव नाईक - Union Minister Narayan Rane
आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीची नोटीस आली होती. एसीबीच्या चौकशीमागे केंद्रीय मंत्री नारायण राणेच ( Union Minister Narayan Rane ) आहेत असा आरोप कुडाळ मालवणचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Shiv Senas Thackeray group MLA Vaibhav Naik ) यांनी केला आहे.
कागदपत्रे घेऊन पुन्हा हजर राहण्याचे आदेश : आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीची नोटीस आली होती. याप्रकरणी वैभव नाईक यांनी कुटुंबासमवेत हजेरी लावली. जवळपास साडेचार तास ही चौकशी झाली. याबाबत बोलताना आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं की, चौकशी झाली म्हणून आदळआपट करणार नाही, पण चौकशी अन्यायकारक झाली हे मात्र तेवढंच खरं आहे. तसेच नऊ डिसेंबरला कागदपत्रे घेऊन पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.
दबाव तंत्राचा भाग असल्याचा आरोप : माझी पत्नी आणि भाऊ यांचेही जबाब नोंदवले गेले. बँकेचे व्यवहार, गाडी कोणाला विकली अशा प्रकारची चौकशी केली गेली. दरम्यान आम्ही शिंदे गटात जात नाही म्हणून हा दबाव तंत्राचा भाग असल्याचा आरोप यावेळी वैभव नाईक यांनी केला. तसेच आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असून, 1996 सालापासूनची सगळी कागदपत्र एसीबीला दिली. नऊ तारखेला पूर्ण कागदपत्र देऊ शकत नाही, वीस वर्षाचा कालावधी असल्यामुळे आम्ही मुदतवाढ मागण्याच्या तयारीमध्ये आहोत असे वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.