रत्नागिरी -केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार निलेश राणे आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची सोमवारी भेट घेतली.
या भेटीदरम्यान राजापूर रिफायनरी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. येत्या कॅबिनेटमध्ये रिफायनरी प्रकल्पाला चालना देणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले. भविष्यात मोठा रोजगार कोकणात निर्माण होणार असल्याने या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात लवकर करावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आले.
Rane Called On Petroleum Minister : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निलेश राणे, प्रमोद जठार यांनी घेतली पेट्रोलियम मंत्र्यांची भेट - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार निलेश राणे आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची सोमवारी भेट घेतली.या भेटीदरम्यान राजापूर रिफायनरी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. येत्या कॅबिनेटमध्ये रिफायनरी प्रकल्पाला चालना देणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले. भविष्यात मोठा रोजगार कोकणात निर्माण होणार असल्याने या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात लवकर करावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आले.
Rane
रिफायनरी आणण्यासाठी सकारात्मक - निलेश राणे यांनी आजच्या भेटीसंदर्भात ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, दिल्लीत आज पेट्रोलियम मंत्री पुरीजी यांच्या दालनात राजापूर रिफायनरी संदर्भात बैठक झाली. केंद्र सरकार रिफायनरी राजापूर बारसू येथे आण्यासाठी सकारात्मक आहे आणि योग्य ती पावलं उचलत आहे.