महाराष्ट्र

maharashtra

खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यात राजरोसपणे अनधिकृतपणे वाळू उत्खनन

By

Published : Dec 3, 2020, 3:30 PM IST

गेल्या महिन्यात खेडच्या तहसील प्रशासनाने धडक कारवाई करत अनधिकृतपणे वाळू उपसा करणारे सक्शन पंप तसेच बोटी पाण्यात बुडवल्या होत्या. मात्र त्यानंतरही सध्या कर्जी परिसरात राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू आहे.

Unauthorized sand mining
अनधिकृतपणे वाळू उत्खनन

रत्नागिरी - खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यात राजरोसपणे अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे. सध्या कर्जी खाडी पात्रात अनधिकृतपणे बेसुमार वाळू उत्खनन सुरू आहे. जवळपास २५ ते ३० बोटींच्या साहाय्याने हे वाळू उत्खनन सुरू आहे. यावर्षी हातपाटीद्वारे वाळू उत्खनन करण्याबाबतचा लिलाव अद्याप झालेला नाही. ही सर्व प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र अशातच वाळू माफियांचं मात्र फावलं आहे.

अनधिकृतपणे वाळू उत्खनन

प्रशासनाचं दुर्लक्ष ?

एवढया मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन सुरू असताना तलाठी, मंडळ अधिकारी तसेच तालुका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करतंय की काय असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.

हेही वाचा - मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञासिंहसह सर्व आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश

गेल्या महिन्यातील कारवाई नंतरही भिती नाही

गेल्या महिन्यात खेडच्या तहसील प्रशासनाने धडक कारवाई करत अनधिकृतपणे वाळू उपसा करणारे सक्शन पंप तसेच बोटी पाण्यात बुडवल्या होत्या. मात्र त्यानंतरही सध्या कर्जी परिसरात राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू आहे. त्यामुळे आशा कारवायांची संबंधितांना भिती वाटत नाही का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

कारवाई करण्याची मागणी

या अनधिकृत वाळू उपसामुळे त्या त्या भागातील ग्रामस्थ व मच्छिमारांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने जातीनिशी लक्ष घालून यांच्यावर रितसर कारवाई करावी अशी मागणी सध्या होत आहे.

हेही वाचा - राज्यातील चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू होणार अतिविशेषोपचार रुग्णालय

ABOUT THE AUTHOR

...view details