रत्नागिरी - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचे आज खातेवाटप जाहीर झाले. या मंत्रिमंडळात उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान खातं उदय सामंत यांना मिळाले आहे. यानंतर उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामंत म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार - उदय सामंत - विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे उदय सामंतांचे वक्तव्य
महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर झाले. या मंत्रिमंडळात उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान खातं उदय सामंत यांना मिळाले आहे. यानंतर उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामंत म्हणाले.
![विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार - उदय सामंत ratnagiri](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5602498-thumbnail-3x2-kakaka.jpg)
उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान खातं मिळाल्यानंतर उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झालं आहे. या मंत्रिमंडळात उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान खातं उदय सामंत यांना मिळालं आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्हा स्तरावर शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज असावीत, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचा मानस सामंत यांनी व्यक्त केला. आपल्यावर मंत्री म्हणून जी जबाबदारी दिली आहे, ती योग्य तऱ्हेने पार पाडीन. विद्यापीठांचे अपग्रेडेशन विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि प्राध्यापकांचे प्रश्न तत्परतेने सोडेन असे, आश्वासन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.