रत्नागिरी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयनेच्या जल विद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची पाहणी केली. यात दौऱ्यात त्यांनी कोळकेवाडी टप्पा ४ मधून टप्पा ५ कार्यांन्वीत करण्यासंदर्भातील महत्वपुर्ण आढावा देखील घेतला.
मुख्यमंत्री ठाकरेंनी केली कोयना जल विद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची पाहणी - उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा न्यूज
मुख्यमंत्री ठाकरेंनी केली कोयना जल विद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची पाहणी केली.
आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्याचा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरूवात त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यापासून केली. सकाळी ते पोफळीत दाखल झाले होते. या दरम्यान, त्यांनी कोयना धरणाच्या चौथ्या टप्प्याची पाहणी केली. यासोबत त्यांनी टप्पा पाचव्या टप्प्याचा आढावा घेतला. महत्वाची बाब म्हणजे, ठाकरे कोळकेवाडी टप्पा 4 ला भेट देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोफळी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकारांना देखील दौऱ्यात प्रवेश देण्यात आलेला नाही.