रत्नागिरी -महाराष्ट्रात सत्तांतर ( Political changes in Maharashtra ) होऊन एक महिना उलटला. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion of Maharashtra ) न झाल्याने विरोधी गट नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. या मंत्रिमंडळाबाबत काही याचिका कोर्टातही आहेत. ( cabinet of Shinde government ) त्यावर आणखी निर्णय झालेला नाही. त्यामुळेही हा विस्तार रखडलेला होता. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असून लवकरच शिंदे गटाचे मंत्रिमंडळ ( Shinde group cabinet ) अस्तित्वात येईल. राजकीय तज्ज्ञांच्या मते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या काही आमदारांना ( MLA Uday Samanat ) पुन्हा मंत्रिपदी संधी मिळू शकते. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम सांभाळलेले उदय सामंत यांची कॅबिनेटमंत्री ( Uday Samant May be in Cabinate minister ) पदी वर्णी लागू शकते. जाणून घेऊया उदय सामंत यांची राजकीय कारकीर्द.
उदय सामंत यांची राजकीय कारकीर्द ( Uday Samant Political Career ) -रत्नागिरी मतदारसंघातून विधानसभेवर सलग निवडून येणारे उदय सामंत हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आमदार. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पुन्हा एकदा निवडून येत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम केले. मतदारसंघातला असलेला प्रभाव आणि एकनाथ शिंदे तसेच अन्य नेत्यांशी असलेले त्यांचे जवळचे संबंध हे त्यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत.