रत्नागिरी- महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती कशी आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही विचार नाही; परंतु त्यानंतरही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार महाविद्यालये सुरू करण्यात येतील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत बोलताना स्पष्ट केले.
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार नाही - उदय सामंत - ratnagiri latest news
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही विचार नाही असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत बोलताना स्पष्ट केले.
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही विचार नाही - उदय सामंत
महाविद्यालये ऑनलाईन सुरू करा किंवा कशाही पद्धतीने करा पण शिक्षण चालू ठेवा, असे युजीसीने सांगितले आहे, पण जोपर्यंत कोव्हिडचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत महाविद्यालये सुरू करणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण दिल्यासारखे आहे, असे सामंत यावेळी म्हणाले.