रत्नागिरी -सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 6 ते 7 च्या दरम्यान आलेला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे हे संकेत आहेत, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शनिवारी पत्रकार परिषदेत म्हणाले. दोन्ही जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री दौऱ्यावर येत असून दोन्ही खासदार देखील उपस्थित राहणार आहेत. खरीप आणि कोविड आढावा अशा दोन बैठका त्यांच्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा पॉझिटिव्हीटी रेट होतोय कमी, कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे हे संकेत - उदय सामंत - sindhudurg uday samant news
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 6 ते 7 च्या दरम्यान आलेला आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर येत असून दोन्ही खासदार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
![रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा पॉझिटिव्हीटी रेट होतोय कमी, कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे हे संकेत - उदय सामंत Uday Samant said Ratnagiri and Sindhudurg's positivity rate is declining](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12194478-866-12194478-1624113928483.jpg)
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा पॉझिटिव्हीटी रेट होतोय कमी, कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे हे संकेत - उदय सामंत
माहिती देताना पालकमंत्री उदय सामंत
चांगला कार्यक्रम काही लोकांना आवडलेला नसावा - सामंत
सिंधुदुर्गमध्ये माझे सहकारी वैभव नाईक यांनी आज (दि.१९ जून) शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अत्यंत उपयुक्त असा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र हा चांगला कार्यक्रम काही लोकांना आवडलेला नसावा, त्याचे दुःख त्यांना झालेले असावे, म्हणून काही ठिकाणी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असेही ते म्हणाले.
Last Updated : Jun 20, 2021, 8:00 AM IST