रत्नागिरी - कोकणात सध्या राणे विरुद्ध शिवसेना असा वाद शिगेला पोहचला आहे. दोन्ही बाजूंनी अरेला कारे प्रत्युत्तर दिले जाते आहे. याबाबत शिवसेनेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, प्रवक्ते उदय सामंत म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा मी मंत्री म्हणून प्रयत्न करेन, तसाच समोरच्यानेही मोठेपणा दाखवला पाहिजे. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
'आमच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा मी मंत्री म्हणून प्रयत्न करेन, तसाच समोरच्यानेही मोठेपणा दाखवला पाहिजे' समोरच्यानेही मोठेपणा दाखवला पाहिजे - उदय सामंत
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेले काही दिवस राणे-विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा पेटलेला आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून एकमेकांच्या नेत्यांचा निषेधही केलेला आहे. याबाबत बोलताना उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, राजकीय जीवनात काम करत असताना आपल्यामुळे काही गोष्टी वादाच्या निर्माण होणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. दोन्ही जिल्हे शांत राहिले पाहिजेत, ही शासनातला मंत्री म्हणून माझी भूमिका आहे. आमच्या कार्यकर्त्यांची जी काही समजूत काढायची आहे ती मी काढेन, त्यांना समजावण्याचा मी मंत्री म्हणून प्रयत्न करेन. तसाच समोरच्यानेही मोठेपणा दाखवला पाहिजे असा टोला यावेळी उदय सामंत यांनी लगावला.
दोन्ही जिल्हे शांत राहिले पाहिजेत - उदय सामंत
माझी इच्छा एवढीच आहे की दोन्ही जिल्हे शांत राहिले पाहिजेत, आणि प्रत्येक पक्ष्याच्या कार्यकर्त्याने आणि नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देत असताना समाजामध्ये वाद होणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे असे सामंत यावेळी म्हणाले.