महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूक निकालापासून सातत्याने वाढतायेत पेट्रोल-डिझेलच्या किंमती - उदय लोध - रत्नागिरी

निकालाच्या दिवशी पेट्रोल ८ पैसे, तर डिझेल ९ पैशांनी महागले होते. त्यानंतर २८ तारखेला पेट्रोल १८ पैशांनी आणि डिझेल ५ पैशांनी महागले होते. म्हणजे २३ तारखेपासून पेट्रोल ७७ पैशांनी, तर डिझेल ५१ पैशांनी महागले आहे.

फाईल फोटो

By

Published : May 29, 2019, 3:32 PM IST

रत्नागिरी - गेल्या ५ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना आपल्या देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. निवडणुकीच्या काळात फार किंमती वाढत्या नव्हत्या. त्यामुळे हा फरक भरून काढण्यासाठी पुढचे काही दिवस किमती वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या किंमती फार वाढणार नसल्याचे मत फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केले आहे.

पेट्रोल-डिझेलबाबत बोलताना उदय लोध

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. निकालाच्या दिवशी पेट्रोल ८ पैसे, तर डिझेल ९ पैशांनी महागले होते. त्यानंतर २८ तारखेला पेट्रोल १८ पैशांनी आणि डिझेल ५ पैशांनी महागले होते. म्हणजे २३ तारखेपासून पेट्रोल ७७ पैशांनी, तर डिझेल ५१ पैशांनी महागले आहे. इराणवरची बंधणे वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. उलट कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या. मात्र, तरीही भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे आता नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने आपल्याकडेही पेट्रोल-डिझेलच्या किमती फार वाढणार नाहीत, असे फामपेडा अध्यक्ष उदय लोध म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details