रत्नागिरीःजिल्ह्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीला समर्थन वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेकरिता वेळ द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेडरेशन ऑफ असोसिएशन्स फाॅर रत्नागिरी डेव्हलपमेंट या संघटनेच्या माध्यमातून उपोषण करण्यात आलं.
रत्नागिरीत रिफायनरी समर्थक संघटनेचे लाक्षणिक उपोषण - ratnagiri refinary
रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीच्या समर्थनार्थ फार्डने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ आंदोलकांनी मागितली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी उपोषण
रत्नागिरी ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प राजापूरमध्येच व्हावा यासाठी विविध माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न रिफायनरी समर्थकांनी आपली बाजू मांडण्यासाठी केला होता. मात्र अजूनही त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही. म्हणून अखेरचा प्रयत्न करावा, या हेतूने प्रजासत्ताक दिनी फेरडरेशन ऑफ असोसिएशन्स फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंट(फार्ड )च्या वतीने उपोषण करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील विविध 60 संघटना या(फार्ड) संघटनेच्या माध्यमातून नाणार रिफायनरीला समर्थन करत आहेत. गेल्याच आठवड्यात राजापूरमधल्या नाणार रिफायनरी समर्थक संघटनेने मुख्यमंत्री कार्यालयाला इमेल करून भेटीची वेळ मागितली होती. मात्र अद्याप याबाबत उत्तर आलं नाही. त्यामुळे आज नाणार रिफायनरीला समर्थन करणाऱ्या फेरडरेशन ऑफ असोसिएशन्स फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंट संघटनेन लाक्षणिक उपोषण केलं. यावेळी अविनाश महाजन, कौस्तुभ सावंत, अॅड. विलास पाटणे, यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
हेही वाचा -पद्मश्री पुरस्कार ही वाशिमकर म्हणून अभिमानाची बाब; नामदेव कांबळे यांची प्रतिक्रिया