रत्नागिरी- ओहोळावर मासे पकडण्यासाठी गेलेले 2 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना राजापूर तालुक्यातील सोलगाव येथे घडली आहे. यामधील तानाजी लक्षण शेळके (40) यांचा मृतदेह सापडला असून चंद्रकांत सखाराम गुरव (42) यांचा शोध सुरू आहे.
मासे पकडणे बेतले जीवावर; रत्नागिरीमध्ये 2 जण गेले वाहून - मासे
ओहोळावर मासे पकडण्यासाठी गेलेले 2 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे.
मासे पकडणे बेतले जीवावर, रत्नागिरीमध्ये 2 जण गेले वाहून
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री उशिरा चंद्रकांत गुरव आणि तानाजी शेळके हे मासे पकडण्यासाठी सोलगावतील ओहोळावर गेले होते. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघेही वाहून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, हे दोघेही घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यामधील तानाजी शेळकेचा याचा मृतदेह सापडला असून, ग्रामस्थांच्या मदतीने चंद्रकांत गुरव यांचा शोध सुरू आहे.