रत्नागिरी- जिल्ह्यात आज आणखी 2 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे, रत्नागिरीतील कोरोनाबाधितांची संख्या आता 392 वर पोहोचली आहे. दरम्यान, उपचारानंतर बऱ्या झालेल्या 15 जणांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आजपर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 118 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
रत्नागिरीत आढळले कोरोनाचे दोन नवे रुग्ण, पंधरा जणांना डिस्चार्ज - रत्नागिरीतील कोरोना रुग्णांची संख्या
जिल्ह्यात आज आणखी 2 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे, रत्नागिरीतील कोरोनाबाधितांची संख्या आता 392 वर पोहोचली आहे. दरम्यान, उपचारानंतर बऱ्या झालेल्या 15 जणांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.5 टक्के आहे. आज समाजकल्याण रत्नागिरीतून 8, जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2, कोविड केअर सेंटर घरडा इन्स्टिटयूट, लवेल, खेड येथून 3 आणि साडवली येथून 2 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. दरम्यान, आज पॉझिटिव्ह आलेल्या 2 अहवालातील रुग्ण कळंबणी येथील आहेत.
जिल्हा रुग्णालयामार्फत आतापर्यंत एकूण 7 हजार 249 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 6 हजार 922 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 390 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर 6 हजार 512 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 327 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. 327 प्रलंबित अहवालामध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 221 अहवाल मिरज आणि 102 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये आहेत.