रत्नागिरी - राजापुरातील शेजवली गावात बिबट्याची दोन पिल्ले मानवी वस्तीत घुसली होती. त्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. वनविभागाने या पिल्लांची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना पकडण्यात यश - leopard news ratnagiri
बिबट्याची दोन्ही पिल्ले विजय गुणाजी घरडे यांच्या घरात घुसली होती. मात्र, या ठिकाणाहून ही दोन्ही पिल्ले प्रकाश महादेव मांजरे यांच्या गोठ्यात लाकडाच्या मचाणाखाली गेली.
मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना पकडण्यात यश
हेही वाचा-राजाला पुरावा मागितलाच तर त्यांनी तो द्यावा - लक्ष्मण माने
बिवट्याची दोन्ही पिल्ले विजय गुणाजी घरडे यांच्या घरात घुसली होती. मात्र, या ठिकाणाहून ही दोन्ही पिल्ले प्रकाश महादेव मांजरे यांच्या गोठ्यात लाकडाच्या मचाणाखाली गेली. याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या पिल्लांना जाळे लावून पकडण्यात आले.