महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजापुरात ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, दोन ठार - चिखलगाव धरण

मंगळवारी एका दुकाचीवर तिघे तरुण राजापूर येथून सौंदळ येथे जात होते. वाटेतच एका भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. ट्रक चालकाने ट्रकसह पलायन केले.

घटनास्थळ
घटनास्थळ

By

Published : Jan 29, 2020, 7:42 AM IST

रत्नागिरी- राजापूर तालुक्यातील सौंदळ मार्गावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.


फैय्याज रायबागकर (वय 23 वर्षे), समीर नाईक (वय 28 वर्षे, दोघे रा. मुस्लिमवाडी, सौंदळ), अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. तर आमान टोले (वय 18 वर्षे) हा गंभीर जखमी झाला असून त्याला कणकवली येथे उपचारासाठी हलवले आहे. हा अपघातात मंगळवारी (दि. 28 जानेवारी) सायंकाळी सहा वाजता झाला. हे युवक राजापूर येथून सौंदळकडे जात होते. अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले.

हेही वाचा - 'कोरेगाव-भीमाप्रकरणी फडणवीस जर निर्दोष आहेत तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे'

तिन्ही तरुण हे मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून राजापूरकडून सौंदळकडे जात होते. राजापूर शिळ, चिखलगाव-सौंदळ मार्गावर चिखलगाव धरणाच्या काही अंतरावर वळणावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात समीर नाईक हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी फैयाज व आमान यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील फैयाज याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर आमान याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे.

हेही वाचा - माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

या प्रकरणातील अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक चालकाने ट्रकसह पलायन केले. या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. घटनेचा तपास पोलीस करत आहेत. तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे सौंदळे गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - रत्नागिरी : 'सीएए' विरोधातील मोर्चात वृद्धाचा मृत्यू, लांजा येथील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details