रत्नागिरी- सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. या पावसामुळे काही ठिकाणी नुकसानही झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरीत पावसामुळे घरावर कोसळले झाड; जीवितहानी नाही - RATNAGIRI
शहरातील टिळक आळी परिसरातील फडके यांच्या कौलारू घरावर रात्री चिंच आणि फणसाचे भलेमोठे झाड पावसामुळे कोसळले. यावेळी घरात माणसं होती. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पावसामुळे घरावर झाड कोसळून नुकसान
शहरातील टिळक आळी परिसरातील फडके यांच्या कौलारू घरावर रात्री चिंच आणि फणसाचे भलेमोठे झाड पावसामुळे कोसळले. यावेळी घरात माणसं होती. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात घराचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या नगरपरिषदेचे कर्मचारी हे झाड बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत.