रत्नागिरी - कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. माणगाव ते कोलाड दरम्यान घोट नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर तब्बल सव्वातीन तासानंतर घोट नदीची धोक्याची पातळी खाली गेल्याने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच गाड्या साडेतीन ते 4 तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
कोकणात मुसळधार : गोव्याकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे 4 तास उशिराने; प्रवाशांचे हाल - rains
मुंबईहून गोव्याकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस तब्बल 4 तास, दिवा सावंतवाडी तब्बल साडेतीन तास उशिराने धावत आहे. त्यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
चिपळूण, रत्नागिरी या रेल्वे स्थानकावर अनेक प्रवाशी 2 ते 3 तास खोळंबून आहेत. सव्वातीन तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरु झाली. दिवा सावंतवाडी ही पहिली गाडी कोलाडहून माणगावच्या दिशेने रवाना झाली. मात्र, सव्वातीन तास वाहतूक ठप्प झाल्याने याचा मोठा परिणाम मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर झाला.
मुंबईहून गोव्याकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस तब्बल 4 तास, दिवा सावंतवाडी तब्बल साडेतीन तास उशिराने धावत आहे. त्यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.