मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक सुरळीत; कंटेनर पल्टी झाल्याने खोळंबली होती वाहतूक - मुंबई-गोवा महामार्गावर अपघात
महामार्गाच्या दोन्ही बाजूला जवळपास एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे अनेक प्रावाशांना त्रास सहन करावा लागला. मात्र, आता वाहतूक सुरळीत झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात
रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे ते बावनदी दरम्यान सकाळच्या सुमारास आयशर कंटेनर पलटल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कंटेनर पलटी झाल्याने मुंबईच्या दिशेने आणि गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला जवळपास एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे अनेक प्रावाशांना त्रास सहन करावा लागला. मात्र, मुंबई-गोवामार्गावरील वाहतूक २ तासानंतर सुरळीत झाली आहे.
Last Updated : Dec 8, 2019, 3:14 PM IST