रत्नागिरी -मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रविवारी (दि. 11 जुलै) सायंकाळी चौपदरीकरणात केलेल्या भरावाची माती मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. काही छोटी वाहने मातीत अडकली होती. अखेर कल्याण टोलवेज ठेकेदार कंपनीची यंत्रणा तेथे दाखल झाल्यानंतर माती हटविण्यात आली.
भराव थेट रस्त्यावर वाहून आला
रविवारी दुपारपासून चिपळूण शहरासह तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसाने महामार्गावर परशुराम घाटात खेडच्या हद्दीतील चौपदरीकरणांतर्गत केलेला भराव थेट रस्त्यावर वाहून आला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहने अडकून पडली होती. काही दुचाकी व अन्य वाहने चिखलात अडकून पडली होती. याविषयी प्रशासनाला माहिती मिळताच कल्याण टोलवेज कंपनीची यंत्रणा तत्काळ मागवून ही माती हटविण्याचे काम सुरू आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणात केलेल्या भरावाची माती मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा -रिफायनरीवरून रत्नागिरीत समर्थन आणि विरोधाचे वातावरण, लोकभावना पाहून निर्णय घेणार शिवसेना