रत्नागिरी -कंटेनमेंट झोन आणि बाजारपेठेत अनिश्चित काळासाठी बंद याविरोधात संगमेश्वरमधील व्यापारी आक्रमक झाले आहेत. संतप्त झालेल्या व्यापाऱ्यानी आज संगमेश्वर बाजारपेठेजवळ आलेले तहसीलदार सुहास थोरात आणि मुख्यकार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड यांना मुंबई महामार्गावर सोनवी चौक येथे घेराव घातला. कंटेंटमेंट झोन कोणत्या निकषावर आधारित आहे, याबाबत आम्हाला प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नाही, प्रशासनाकडून आम्हाला सहकार्य मिळत नाही, त्यामुळे आता आमच्या संयमाचा अंत झाला आहे, अशा व्यथा यावेळी मांडण्यात आल्या.
संगमेश्वरमधील व्यापारी आक्रमक व्यापारी आक्रमक
जिल्हाधिकारी यांनी संगमेश्वर तालुक्यातील पाच गावे कोरोनाबाधितक्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर या ठिकाणी कंन्टेटमेंट झोन जाहिर करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतरही बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. याउलट अधिकच नियम कडक करण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. मंगळवारी सकाळच्या दरम्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार सुहास थोरात संगमेश्वरात बुरंबी येथे कोविड विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनासाठी येणार असल्याचे समजताच संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संगमेश्वर सोनवी चौक येथे एकत्र आले आणि त्यांनी मुख कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी व्यापारी सुशांत कोळवणकर यांनी व्यापाऱ्यांची होणार फरफट आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक याबाबत सांगितले.
...नाहीतर गुरूवारपासून दुकाने उघडणार
गेल्या दोन महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यात व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास सुट देण्यात आली नव्हती. मात्र आता ती मिळाली आहे. त्यामुळे या कंन्टेंटमेंट झोनमुळे सध्या या ठिकाणची बाजारपेठ पुर्णतः बंद ठेवण्यात आलीय. पण इथली रुग्ण संख्या कमी आहे, त्यामुळे इथले व्यवहार सुरु करण्याची परवानगी दोन दिवसात द्या अन्यथा इथले दुकानदार गुरूवारपासून इथली दुकाने उघडतील असा इशारा इथल्या व्यापाऱ्यांनी दिला आहे. प्रशासनाने कारवाई केल्यास कारवाईला सामोरे जायला सर्व व्यापारी एकजुटीने तयार आहेत असंही व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात निवेदन तहसिलदार आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं आहे.