रत्नागिरी- पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना उत्साहाच्या भरात बऱ्याचदा नुकसानीला सामोरे जावे लागते. तर काहीवेळी जीव धोक्यात जाण्याच्या घटनाही समोर येतात. जिल्ह्यातल्या भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना त्यांचा अतिउत्साह अंगलट आल्याचा प्रकार समोर आला आहे. या पर्यटकांची एक चारचाकी समुद्र किनारी वाळूत अडकल्याची घटना घडली आहे.
पर्यटकांचा अतिउत्साह अंगलट भरतीच्या पाण्याने कार बाहेर काढण्यास अडथळा-
भाट्ये समुद्र किनारी स्कॉर्पिओ गाडी घेऊन काही पर्यटक आले होते. या उत्साही पर्यटकांनी नियमांची पायमल्ली करत त्यांची स्कॉर्पिओ थेट समुद्र किनाऱ्यावर आणली. मात्र, त्यांची गा़डी किनाऱ्यावरील वाळूत रुतली गेली. त्यातच समुद्राला भरती असल्यामुळे ही गाडी बाहेर काढण्यास अडथळे निर्माण होऊ लागले आहेत.
बुधवारी सकाळच्या सुमारास या पर्यटकांची ही गाडी वाळूत अडकली आहे. मात्र, त्यांची गाडी वाळूत अडकताच, किनाऱ्यावर गाडी घेऊन जाणे त्यांच्या अंगलट आले आहे. कारण भरती असल्याने समुद्राचे पाणी वाढू लागले आहे. त्यानंतर त्यांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने ती गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत,