रत्नागिरी- निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण. कोकणातील सौंदर्य थंडीतच अधिक खुलतं. सध्या कोकणात हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची चाहूल दिली आहे. सध्या कोकणात तापमानाचा पारा घसरतोय. त्यामुळे कोकण सध्या धुक्यामध्ये हरवत आहे आणि हे विहंगम दृश्य प्रवास करताना मनाला एक वेगळं सुख देऊन जातं.
गुलाबी थंडीतील कोकणाचं सौंदर्य हेही वाचा - लांजा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची बाजी, नगराध्यक्षपदी मनोहर बाईत!
हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत कोकण रेल्वेतून प्रवास म्हणजे निसर्गाची पर्वणी. चहू बाजूला धुक्याच्या आड गेलेल्या डोंगररांगा आणि त्यातून वाट काढत जाणारी कोकण रेल्वे पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. त्यामुळेच हा निसर्गाचा विलोभनीय नजराणा पाहण्यासाठी अनेकजण खास कोकण रेल्वेतून प्रवास करतात.
हेही वाचा - सावरकरांवरील वादग्रस्त लिखाणाचा रत्नागिरीतील सावरकरप्रेमींकडून निषेध
कोकणात सध्या वळणावळणाचे घाट रस्ते आणि त्यांचं सौंदर्य थंडीच्या चाहुलीने अधिक खुलले आहेत. घाट माथ्यावरच्या डोंगरावरुन धुक्यातून अंधुक दिसणारे डोंगर इथली लपाछपीचा डाव खेळणारी हिरवाई आणि दाट धुक्यात सुद्धा वळळावणात हरवेला रस्ता हे सौदर्य इथं येऊन प्रत्येकाने पहाण्याचा आनंद काही वेगळाच आहे.