गणपतीपुळे (रत्नागिरी) - गणपतीपुळे येथे मासेमारीसाठी टाकण्यात आलेल्या जाळ्यात कासव अडकले. जाळ्यामुळे कासव जखमी होऊन समुद्रकिनाऱ्यावर अखेरची घटका मोजत होते. मात्र, गणपतीपुळे संस्थानाच्या कर्मचाऱ्यांनी या कासवाला पाण्यात सोडून जीवनदान दिले आहे.
गणपतीपुळे: जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवनदान... - रत्नागिरी बातमी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक नसल्याने गणपतीपुळे येथील समुद्र किनारा सुना आहे. समुद्रकिनारी एक कासव जाळ्यात अडकले होते.

जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवनदान...
जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवनदान...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक नसल्याने गणपतीपुळे येथील समुद्र किनारा सुना आहे. समुद्रकिनारी एक कासव जाळ्यात अडकले होते. सुटकेसाठी ते धडपड करत होते. मात्र, किनाऱ्यावर कोणीच नसल्याने ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. गणपतीपुळे संस्थान कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कासवाची जाळ्यातून सुखरुप सुटका केली. कासवाला परत पाण्यात सोडले. जवळपास 2 फुट रुंदीचे हे कासव होते.