रत्नागिरी -जिल्ह्यात मागील 24 तासांत 481 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 हजार 836 एवढी झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज 481 नवे कोरोना रुग्ण -
आज आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 481 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 233 रुग्ण आरटीपीसीआर, तर 248 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 28 हजार 836 वर जाऊन पोहचली आहे. मागील 24 तासात 1634 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 922 जणांपैकी 689 निगेटिव्ह तर 233 तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 193 पैकी 945 निगेटिव्ह तर 248 पॉझिटिव्ह आले आहेत.