रत्नागिरी - जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे. आज (शनिवार) एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 13 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 34 वर पोहोचली आहे. यातील अॅक्टिव्ह रुग्ण 28 आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याची चिंता वाढली, आज नवीन 13 कोरोनाग्रस्तांची नोंद - corona update in ratmagiri
एकाच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 13 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 34 वर पोहोचली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे या 8 दिवसांत सापडलेल्या रुग्णांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री मुंबई आहे. मुंबईतून जिल्ह्यात दाखल झालेल्या या चाकरमान्यांचे अहवाल सातत्याने पॉझिटीव्ह येत असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अशातच शनिवारी मंडणगड तालुक्यात एक दोन नाही तर तब्बल 11 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले. हे सर्वजण मुंबईतून आल्यानंतर क्वारंटाईन करण्यात आले होते. यांचे रिपोर्ट शनिवारी आले असून यात 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे.
शनिवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाला उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार मंडणगड येथे 11 आणि कळंबणी अंतर्गत 2 अशा एकूण 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंडणगड येथे या 11 जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व 11 जणांची प्रवास हिस्ट्री म्हणजे हे सर्व मुंबईतून आले आहेत. यातील 9 जण पंदेरी या गावातील असून, एक म्हाप्रळ व पालवणी येथील एक आहे. तर खेड तालुक्यातील कळंबणी अंतर्गत दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघांना लवेल येथे क्वारंटाईन केले होते. या दोघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. दरम्यान, मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोनाची लागण हा जिल्ह्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे.