रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटले आणि होत्याचे नव्हते झाले. या धरणाशेजारी असलेल्या भेंडेवाडीतील जवळपास 12 ते 15 कुटुंबातील 24 माणसं बेपत्ता झाली. कामानिमित्त शहरात असलेले घटनेची माहिती कळताच रात्रीच घटनास्थळी आले. मात्र, त्यांना दिसला तो चिखल, वाहून गेलेली घरं, मोडलेले वासे. त्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. कोणाचे आई-वडील गेले होते, तर कोणाचे भाऊ, कोणाचा मुलगा, मुलगी तर कोणाचं अख्य कुटुंबच वाहून गेलं होतं. आपलं कोणीच दिसत नाही, हे पाहून अनेकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकत होता.
आमचं इथं कोणीचं दिसना....काळरात्रीची घटना प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून - dam
चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील लघुपाटबंधारे विभागाचे तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटले. मात्र, या दुर्घटनेनंतर इथल्या खुणासुद्धा पुसून गेल्या आहेत.
चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील लघुपाटबंधारे विभागाचे तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटले. मात्र, या दुर्घटनेनंतर इथल्या खुणासुद्धा पुसून गेल्या आहेत. या ठिकाणी एक गणपतीचे मंदिर होते. मात्र, त्याची एकही खून जाग्यावर नाही. इथली घरे वाहून गेली आहेत. तिवरे धरण फुटल्यानंतर काही क्षणात भेंडेवाडी होत्याची नव्हती झाली. धरण फुटल्यानंतर इथली परिस्थिती क्षणार्धात कशी बदलली हे गावातील लोकांकडून जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी...
काय आहे घटना -
मुंबईसह कोकणच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत होता. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यात तिवरे गाव चिपळूण तालुक्याच्या एका टोकाला आहे. तसा हा भाग दुर्गम आहे. या तिवरे गावात बांधण्यात आलेले धरण 2000 साली पूर्णत्वास गेले होते. या धरणाच्या पाण्याची पूर्ण संचय पातळी 139 मीटर आहे. या धरणाच्या पाणी साठ्याची एकूण क्षमता 2.45 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या धरणातील पाण्याचा दसपटीतील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीला उपयोग होत होता. प्रशासनाच्या 2 जुलैच्या अव्हालानुसार हे धरण 27.59 टक्के भरलं होते. एकूण 131 मीटर पाणीपातळी धरणात होती.दरम्यान या धरणाला दोन वर्षांपूर्वी गळती लागली होती. गेल्यावर्षी या गळतीत वाढ झाली होती. या गळतीमुळे धरणाच्या मुख्य दरवाज्याशेजारी भगदाड पडले होते. याची वेळेत दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून गेल्यावर्षी या धरणाची संयुक्त पाहणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही धरणाच्या दुरुस्तीला काही वेग आला नव्हता. पावसाळ्यापूर्वी धरणाची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात धरणाला धोका पोहोचण्याचा शक्यताही वर्तविण्यात येत होती.