महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 6, 2019, 7:17 PM IST

ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटना: प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचे बळी, स्थानिकांच्या पत्रव्यवहारानंतरही कानाडोळा

तिवरे धरणाला गळती लागली होती. या बाबत स्थानिक नागरिक अजित चव्हाण यांनी चिपळूणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहले. मात्र, मुर्दाड प्रशासनाने फक्त कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानली.

तिवरे धरण फुटल्यानंतरचे छायाचित्र

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण २ जुलैच्या रात्री फुटले आणि एकच हाहाकार उडाला. त्यानंतर सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. मात्र, प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते, तर ही दुर्घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी दिली.

तिवरे धरण दुर्घटनेविषयी माहिती देताना नागरिक

तिवरे धरणाला गळती लागली होती. या बाबत स्थानिक नागरिक अजित चव्हाण यांनी चिपळूणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहले होते. मात्र, मुर्दाड प्रशासनाने फक्त कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानली. आणि ज्याने पत्रव्यवहार केला त्याच्याच घरातील पाच जणांना जीव गमवावा लागला. नेमका हा काय पत्रव्यवहार आहे, अजित चव्हाण यांच्या पत्राला प्रशासनाने नेमके काय उत्तर दिले. पाहुया हा रिपोर्ट.....

ABOUT THE AUTHOR

...view details