रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या धरणफुटीच्या या घटनेत भेंदवाडीतील काही घरे वाहून गेली होती. त्यामध्ये २३ जण बेपत्ता झाले होते. त्यानंतर बुधवारी एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहिम सुरू केली होती.
तिवरे धरण दुर्घटना : आज आणखी एक मृतदेह मिळाला, मृतांचा आकडा १४ वर
तिवरे धरण फुटल्यानंतर बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सकाळपासून शोध मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यानंतर काल सायंकाळपर्यंत १३ मृतदेह हाती लागले होते. त्यानंतर आज सकाळी आणखी एकाचा मृतदहे सापडला आहे.
तिवरे धरण फुटल्यानंतर बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सकाळपासून शोध मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यानंतर काल सायंकाळपर्यंत १३ मृतदेह हाती लागले होते. त्यानंतर आज सकाळी आणखी एकाचा मृतदहे सापडला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बुधवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तिवरे दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांची कामथे उपजिल्हा रुग्णालयात भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत जाहीर करुन दुर्घटनाग्रस्तांना ४ महिन्यात पक्की घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.
तिवरे धरण फुटल्याने नजीकचा दादर पूलही पाण्याखाली गेला आहे. त्यानंतर ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे, सती, गाणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, २ वर्षांपासून धरणाची गळती सुरू होती. वारंवार तक्रार करूनही ती दुरस्त केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. हे धरण २० वर्षापूर्वी शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने बांधले होते.