महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटना: विशेष चौकशी पथक आज करणार घटनास्थळाची पाहणी

सरकारकडून 6 जुलै रोजी दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी विशेष चौकशी पथक स्थापन केले होते. हे पथक आज घटनास्थळाची पाहणी करणार आहे.

By

Published : Jul 15, 2019, 8:14 AM IST

तिवरे धरण

रत्नागिरी - तिवरे धरण दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेले विशेष चौकशी पथक आज घटनास्थळाची पाहणी करणार आहे. जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे हे या पथकाचे प्रमुख असून या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे 22 जण बेपत्ता झाले होते. त्यातील 20 जणांचे मृतदेह सापडले तर 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या दुर्घटनेला जबाबदार कोण, प्रशासनाचा हलगर्जीपणा नडला की, ठेकेदार जबाबदार, असे अनेक प्रश्न या दुर्घटनेमुळे उपस्थित झाले होते. दरम्यान सरकारकडून 6 जुलै रोजी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आले होते.

तिवरे धरण

तिवरे धरण फुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे, त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाय योजना सुचविणे ही या चौकशी पथकाची जबाबदारी आहे. या पथकाने दोन महिन्यात आपला चौकशी अहवाल सादर करायचा आहे. त्यानुसार हे पथक आज तिवरे इथे दाखल होणार आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हे पथक स्थानिकांंशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details