रत्नागिरी - तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं. या दुर्घटनेत कोणी आपला भाऊ गमावला, कोणी आई-वडील, कोणी मुलगा तर कोणी अख्ख कुटुंब गमावलं. अजित चव्हाण यांच्या तर संपूर्ण कुटुंबावरच काळाने घाला घातला. या दुर्घटनेत अजित चव्हाण यांनी आई-वडील, भाऊ, भावजय गमावली, चिमुकली पुतणी दुर्वा आजही बेपत्ता आहे. या सर्वांची उणीव नेहमी जाणवत असल्याचं अजित चव्हाण सांगतात, विशेष म्हणजे मोठ्या भावाचा मोठा आधार आपल्याला होता, पण आज तोही या जगात नाही, त्यामुळे आपला आधारच हरपल्याची भावना अजित चव्हाण यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
ईटीव्ही भारत विशेष : तिवरे धरण दुर्घटना - 'दुर्वा आजही बेपत्ता, आठवणीने डोळे पाणावतात' - रत्नागिरी तिवरे धरण बातमी
अनंत चव्हाण हे अजित चव्हाण यांचे वडील. तिवरे धरणाच्या शेजारी राहणारे अनंत चव्हाण अतिशय मनमिळाऊ, अनंत चव्हाण हे त्यांची पत्नी अनिता चव्हाण, मुलगा रणजित चव्हाण, सून ऋतुजा रणजित चव्हाण आणि दीड वर्षांची नात दुर्वा रणजित चव्हाण यांच्यासह तिवरे धरणाच्या शेजारी असणाऱ्या भेंद वाडीत राहत होते. तर दुसरा मुलगा अजित हा कामानिमित्त गावापासून बाहेर राहायचे. अतिशय आनंदात हे कुटुंब राहत होतं. मात्र 2 जुलै 2019 ची रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली.
अनंत चव्हाण हे अजित चव्हाण यांचे वडील. तिवरे धरणाच्या शेजारी राहणारे अनंत चव्हाण अतिशय मनमिळाऊ, अनंत चव्हाण हे त्यांची पत्नी अनिता चव्हाण, मुलगा रणजित चव्हाण, सून ऋतुजा रणजित चव्हाण आणि दीड वर्षांची नात दुर्वा रणजित चव्हाण यांच्यासह तिवरे धरणाच्या शेजारी असणाऱ्या भेंद वाडीत राहत होते. तर दुसरा मुलगा अजित हा कामानिमित्त गावापासून बाहेर राहायचे. अतिशय आनंदात हे कुटुंब राहत होतं. मात्र 2 जुलै 2019 ची रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. पाचही जण या दुर्घटनेत बेपत्ता झाले. त्यानंतर दुर्वा वगळता चौघांचे मृतदेह सापडले, मात्र दुर्वा अद्यापही बेपत्ता आहे. या दुर्घटमुळे अजित चव्हाण पुरते कोलमडून गेले.