महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटनेला एक महिना पूर्ण; भेंदवाडीचे माळीणच्या धर्तीवर होणार पुनर्वसन - tivre dam

जिल्ह्यातल्या तिवरे धरण फुटी दुर्घटनेला आज एक महिना पूर्ण झाला. या दुर्घटनेतील तिवरे भेंंदवाडीचे माळीणच्या धर्तीवर कायमस्वरूपी पुनर्वसन होणार असल्याची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली आहे.

तिवरे धरण दुर्घटनेला एक महिना पूर्ण

By

Published : Aug 2, 2019, 12:34 PM IST

रत्नागिरी- जिल्ह्यातल्या तिवरे धरण फुटी दुर्घटनेला आज एक महिना पूर्ण झाला. या दुर्घटनेतील तिवरे भेंंदवाडीचे माळीणच्या धर्तीवर कायमस्वरूपी पुनर्वसन होणार असल्याची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली आहे. अलोरे येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर हे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे. सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून हे पुनर्वसन होणार आहे. आठवड्याभरात हा प्रस्ताव सिद्धिविनायक ट्रस्टकडे पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

तिवरे धरण दुर्घटनेला एक महिना पूर्ण

2 जुलैच्या रात्री गळती लागलेले तिवरे धरण फुटले होते. धरणानजीक वसलेल्या भेंदवाडीचे होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत एकूण 22 जण बेपत्ता झाले होते. 22 पैकी 21 मृतदेह सापडले. मात्र. दीड वर्षांची दूर्वा अद्यापही बेपत्ता आहे. दरम्यान. मृतदेह सापडलेल्या 21 पैकी 19 जणांच्या वारसांना शासनाकडून धनादेश वाटप करण्यात आले आहेत.आतापर्यंत शासनाकडून 6 लाखांची मदत करण्यात आली. आपत्कालीन निधीतून 4 लाख आणि पंतप्रधान मदत निधीतून 2 लाखांचा धनादेश देण्यात आले आहेत. तर 2 मृतदेहांचा वारस तपास अद्याप झालेला नाही.

दरम्यान, या दुर्घटनेतील सध्या 15 कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन कंटेनरमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर 45 कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या अलोरे येथील जागेवर 'माळीण'च्या धर्तीवर करण्यात येणार आहे. या कुटुंबांना प्रत्येकी जवळपास 415 स्क्वेअर फुटांचे पक्के घर बांधून देण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पूर्ण प्रस्ताव तयार झाल्यानंतर सिद्धिविनायक ट्रस्टकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक तसेच मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. धरणाच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहारही करण्यात होता. मात्र, तरीही तात्पुरती मलमपट्टी करण्यापलीकडे संबंधित विभागाकडून काहीच करण्यात आले नाही. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी शासनाकडून नेमण्यात आलेल्या विशेष उच्चस्तरीय चौकशी पथकाने घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांचे म्हणणंही ऐकून घेतले आहे. त्यामुळे या पथकाचा अहवाल नेमका काय येतो या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details