महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Throwing Stones on Bus : खेड-दापोली बसवर दगडफेक - Throwing stones on Khed-Dapoli bus

राज्यात एसटी कर्मचारी हे गेल्या वीस दिवसापासून संपावर ( ST Worker Strike ) आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही आगारातील एसटी कामगार हे कामवर परत येत आहेत. रत्नागिरीतील काही कर्मचारी हे कामवर परतले आहेत. दरम्यान, काही अज्ञात माथेफिरूंनी दापोली बसवर दगडफेक ( Throwing Stones on Bus ) केल्याची घटना घडली आहे.

Throwing Stones on Bus
खेड-दापोली बसवर दगडफेक

By

Published : Nov 28, 2021, 7:20 AM IST

Updated : Nov 28, 2021, 8:34 AM IST

रत्नागिरी - खेड-दापोली या बसवर अज्ञाताने दगडफेक ( Throwing Stones on Bus ) केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी सव्वासात ते आठचे दरम्यान ही दगडफेकीची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान दापोली पोलीस स्टेशन ( Dapoli Police Station ) मध्ये अज्ञाताचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड-दापोली बसवर दगडफेक

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल -

राज्यात एसटी कर्मचारी हे गेल्या वीस दिवसापासून संपावर ( ST Worker Strike ) आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही आगारातील एसटी कामगार हे कामवर परत येत आहेत. रत्नागिरीतील काही कर्मचारी हे कामवर परतले आहेत. दरम्यान, काही अज्ञातांनी दापोली बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञाताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा -१८ हजार एसटी कर्मचारी कामावर रुजू.. ३,२१५ कर्मचारी निलंबित तर १,२२६ कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई

Last Updated : Nov 28, 2021, 8:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details