रत्नागिरी - चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील तीन मुलींचा समावेश आहे. या मुली खेड तालुक्यातील असून चीनमधील नानटॉग प्रांतातील विद्यापीठात शिक्षणासाठी गेल्या आहेत. दरम्यान या तिन्ही विद्यार्थिनी सुरक्षित असून त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. यातील एका विद्यार्थिनीशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधला. यावेळी या विद्यार्थीनी सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा... चीनमधील भारतीयांना 'एअरलिफ्ट' करण्यासाठी विशेष विमान आज होणार रवाना..
विद्यार्थिनींपैकी सादिया बशीर मुजावर हिच्याशी त्यांनी दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. खेडमधील सुमेना मुनीर हमदुले, झोया महवाश हमदुले आणि सादिया बशीर मुजावर या तीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीनमध्ये राहत आहेत.