रत्नागिरी - जिल्ह्यात नव्या तीन कोरोनाबाधितांची भर पडलीय. गुरुवारी(१५ मे) मध्यरात्री जिल्हा प्रशासनाला 74 अहवाल प्राप्त झाले. यामधील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 77 वर पोहोचली आहे. नव्याने भर पडलेल्या रुग्णांमधील एकजण रत्नागिरी तर संगमेश्वरमधील दोघांचा समावेश आहे.
आणखी 3 जणांना कोरोनाची लागण; रत्नागिरीत बाधितांची संख्या 77 वर - corona in ratnagiri
मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी(१५ मे) मध्यरात्री जिल्हा प्रशासनाला 74 अहवाल प्राप्त झाले. यामधील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रत्नागिरीतील रुग्णांची संख्या 77 वर पोहोचली आहे.
मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा रुग्णालयातून दोन नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 1 अहवाल पॉझिटिव्ह तर 1 निगेटिव्ह आला आहे. जिल्हा रुग्णालयातील आणखी एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याचे यानंतर स्पष्ट झाले. तर संगमेश्वर तालुक्यातून पाठवण्यात आलेले दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यातील एक भडकंबा तर दुसरा रुग्ण देवळे येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 77 वर पोहचला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी संचारबंदी कडक करण्यासाठी प्रसासन प्रयत्नशील आहे. तसेच बाधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आला आहे.