रत्नागिरी - बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभागाने जेरबंद केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली, राजापूर येथील एका पेट्रोल पंपावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या तीनही संशयित आरोपीना प्रथम वर्ग न्यायालय राजापूर येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीना ४ दिवसांची वन कोठडी दिली आहे.
बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे तिघे राजापूरमध्ये जेरबंद; वनविभागाची कारवाई - बिबट्याच्या कातडीची तस्करी
बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभागाने जेरबंद केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली, राजापूर येथील एका पेट्रोल पंपावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या तीनही संशयित आरोपीना प्रथम वर्ग न्यायालय राजापूर येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीना ४ दिवसांची वन कोठडी दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली राजापूर येथील एका पेट्रोल पंपावर तीन संशयित दुचाकीस्वारांची वनविभागाकडून तपासणी केली असता त्यांच्या बॅगेमध्ये बिबट्या, वन्य प्राण्यांची कातडी आढळून आली. त्यामुळे वन्य प्राण्याच्या तस्करीबाबत आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले. जयेश बाबी परब (वय २३ रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग), दर्शन दयानंद गडेकर (2 , रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) आणि दत्तप्रसाद राजेंद्र नाईक (22 रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) अशी तीन संशयितांची नावे आहेत. आरोपींकडून बिबट्या या प्राण्याची कातडी जप्त करण्यात आली आहे.
वरील सर्व आरोपींनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ५१, ५२ चा भंग केलेला आहे. वरील सर्व आरोपींच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ५१, ५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांकडून दोन मोटरसायकली जप्त करुन ताब्यात घेतल्या आहेत. तसेच ओप्पो, रेडमी, व्हिवो या कंपन्यांचे मोबाईल आरोपींकडून जप्त करुन ताब्यात घेतले आहेत. सदर आरोपींनी आपला गुन्हा कबुल केलेला असून पुढील तपास सुरू आहे.