रत्नागिरी - माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगत एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. ही धक्कादायक घटना रत्नागिरीतील गुहागरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुहागरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तिघांवर गुन्हा दाखल - police
देशात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशातच रत्नागिरीमध्ये अशीच एक घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गुहागर बस डेपोचा वॉचमन निलेश चव्हाण, निखील पिल्ले, आणि धीरज देवकर या तिघांना गुहागरच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने गुहागरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाने गुहागर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक मार्च ते ३० मे या कालावधीत मोडकाआगर (ता. गुहागर), आवाशी देऊळवाडी (ता. खेड), गुहागर एसटी स्टँडच्या मागे तीन ठिकाणी तिघांनी मोबाईलवर फोन करून पीडित मुलीला तुझ्यावर माझे प्रेम आहे असे सांगत बलात्कार केला.
या प्रकरणी गुहागर डेपोचा वॉचमन निलेश यशवंत चव्हाण, खेड वाशी देऊळवाडी येथील निखील राजन पिल्ले व गुहागर मोडकाआघर येथील धीरज देवकर या तिघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
त्यांच्यावर भा.द.वि कलम १८६० प्रमाणे ३७६(३), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे ४, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे ८, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे १२, अनुसूचित जाती जमाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार अधिनियम १९८९ चे ३ (१), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार १९८९ ३ (l) (w) (ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव करीत आहेत.