रत्नागिरी - लोटे एमआयडीसी मधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे दाभोळ खाडीत पुन्हा एकदा मासे मरण्याची घटना घडली आहे. दूषित पाण्यामुळे हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचं चित्र आहे.
जल प्रदूषणाचा फटका..! दाभोळ खाडीत पुन्हा हजारो मृत मासे तरंगतायेत पाण्यावर - Fish
लोटे एमआयडीसीतील कंपन्यांकडून वारंवार दूषित पाणी दाभोळ खाडीत सोडलं जातं. या पाण्याच्या गंभीर परिणाम नदीतील माशांवर होत आहे. दूषित पाण्यामुळे हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचं चित्र आहे.
लोटे एमआयडीसीतील कंपन्यांकडून वारंवार दूषित पाणी दाभोळ खाडीत सोडलं जातं. या पाण्याच्या गंभीर परिणाम नदीतील माशांवर होत आहे. यापूर्वी या खाडीतून वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळायचे, पण गेल्या वर्षांमध्ये हे मासे मात्र मिळेनासे झाले आहेत. त्याला कारण आहे लोटे एमआयडीसीतून दाभोळ खाडीत सोडलं जाणारं प्रदूषित पाणी.
या पाण्यामुळे वारंवार मासे मरण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे भोई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान आताही पुन्हा दाभोळ खाडीत मासे मरू लागले आहेत. हजारो मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पण प्रशासन मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. त्यामुळे भोई समाज आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.