रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस थुळवाडीतल्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. भेगा सातत्याने रुंदावल्या जात असल्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भेगा रुंदावल्यामुळे थुळवाडीतील एका घराची भिंत जमीनदोस्त झाली आहे. थुळवाडीप्रमाणे आता गुरववाडीला जमिन खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. थुळवाडीला लागून असलेल्या डोंगरावरील जमीन पुन्हा मोठ्या प्रमाणात खचली आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
फुणगूस थुळवाडीतल्या जमिनीच्या भेगा वाढल्या; झाड कोसळून घराची भिंत जमीनदोस्त - the wall
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस थुळवाडीतल्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. भेगा सातत्याने रुंदावल्या जात असल्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या फुणगूस खाडी भागातील थुळवाडी येथे काही दिवसांपूर्वीच जमिनीला भेगा पडल्याचे समोर आले होते. या भेगा वाढत जात असून येथील २० ते २२ घरांना धोका निर्माण झाल्याचे समोर येताच प्रशासनाडून पाहणी करण्यात आली होती. भूगर्भशात्रज्ञ यांनीही पाहणी केली होती. दरम्यान, सध्या जमिनीला पडलेल्या भेगा रुंद होऊन अधिक खोलवर गेल्या आहेत. त्यामुळे येथील पूर्ण डोंगरच खचू लागला आहे. डोंगर खचू लागल्याने येथे असलेली झाडे देखील कोसळू लागली आहेत. वसंत थूळ यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांच्या घराची भिंत जमीनदोस्त झाली आहे. आजूबाजूच्या परिसरात देखील भेगा पडत आहेत.